सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड वर होणाऱ्या राज्याभिषेक पूजेसाठी राजगड तालुक्यातील किल्ले तोरणा व किल्ले राजगड अशा दोन ऐतिहासिक किल्ल्यावरून दोन कलशांमध्ये पाणी आणण्यात आले व हे पाणी वेल्हे पंचायत समिती समोरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर या पाण्याच्या जलकुंभाचे पूजन करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ गटविकास अधिकारी पंकज शेळके वेल्हे तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आनंद देशमाने पंचायत समितीचे कृषी विभागाचे विस्ताराधिकारी उत्तम साखरे कर्मचारी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अरुण आवळे,वेल्हाचे ग्रामसेवक अजित कुंभार उपस्थित होते
किल्ले रायगडावर हे जलकुंभ किल्ले तोरणा व किल्ले राजगड वरून आणण्यासाठी शिवाजी भोरेकर विनोद दिघे वेदांत जेधे राहुल भोरेकर राहुल दिघे व लहुजी जेधे यांनी या दोन किल्ल्यावरील पाणी हे आणलेला आहे हे पाण्याचे घेऊन जलकुंभ घेऊन किल्ले रायगडला घेऊन जाणार आहेत व उद्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी या ऐतिहासिक दोन किल्ल्यांच्या या पाण्याचा अभिषेक महाराजांच्या पुतळ्याला घातला जाणार आहे.