सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : सुनील जाधव
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ड्रोन बाबत सूचना देऊनही अजून पोलीस अथवा शासकीय यंत्रणेला ड्रोनबाबत तपास लागला नाही.
वडगाव निंबाळकर परिसरात 31 मे रोजी एकच रात्री पाच ठिकाणी जबरी चोरीचा प्रकार घडलेला आहे. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवजी लंपास चोरट्यांनी केला. पोलीस तक्रार दाखल करून आज सहा दिवस झाले तरीही पोलिसांना कोणतेही धागेद्वारे सापडले नाहीत. यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये निराशा दिसून येत आहे. रात्र झाली की नागरिक रात्रभर गस्त घालत आहे. सर्व नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांची कोणतीही ठोस भूमिका अजून पर्यत घेतलेली नाही. यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. वडगाव निंबाळकर गावच्या काही मिनिटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन असून चोर एवढ्या बिनधास्तपणे चोरी करतायेत. तरीही पोलिसांची कोणतीही आक्रमक भूमिका नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. झालेल्या चोरीच्या प्रकाराबद्दल कुठेही विचारपूस नाही. यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्नच निर्माण होत आहे. गेल्या सहा दिवसापासून वडगाव निंबाळकर परिसरात ड्रोन फिरत आहे, चोरीचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की या चोरांमध्ये स्थानिक चोर सामील असावे. परंतु पोलीस यंत्रणा गप्प का? चोरांच्या मनात पोलिसांविषयी असणारी भीती राहिली नाही का? झालेल्या चोरीसाठी पोलीस यंत्रणेकडून तपास जलद गतीने व्हावा याकरता मागणी होत आहे.