सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे (रायबाचा मळा) येथे काल मध्यरात्री घरातले लोक जागे झाल्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला.
अजित उत्तमराव निगडे रा. गुळूंचे. (रायबाचा मळा) यांच्या घरावरती मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन ते चार चोरटे चोरीच्या उद्देशाने चाल करून आले होते घराची कडी गजाने वाकूवुन व दरवाज्याला थोडीशी फट असल्याने त्यामध्ये गजाने वाकवून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला परंतु घरातील लोक जागे झाल्यामुळे चोरटे पसार झाले चोरट्यांनी शेजारील घरालाही कडी लावण्याचा प्रयत्न केला होता या घटनेमुळे घरातील लोक भयभीत झाले आहेत उत्तम निगडे यांचा मुलगा मनीष वेळीच जागा झाल्याने त्याने आरडाओरडा केला घरातील लोकांचा आवाजामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला. रात्रीची गस्त घालणारी पोलीस स्टेशनची गाडी फक्त गुळूंचे मार्गावरती येते आतील वाड्यावर ती जात नाही ती गाडी आत मधील वाड्या वस्तीवरती ही यावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.