सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर -वेल्हा तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या कुरुंगवडी ता.भोर येथे मंगळवार दि.४ घराला अचानक लागलेल्या आगीत पूर्ण घर संसार जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सद्या कडक उन्हाळा असल्याने ग्रामीण भागात घराला आग लागण्याचे प्रकार बऱ्याचदा घडत असतानाच कुरुंगवडी ता.भोर येथील शेतकऱ्याच्या राहत्या घराला अचानक आग लागली.आग विझवण्यासाठी ग्रामस्थ,तरुणांनी शर्तीचे प्रयत्न केले.मात्र आगिने रुद्र रूप धारण केल्याने आगीत घरातील धान्य, कपडे ,जनावरांचा चारा तसेच घरातील महागाई वस्तू जळून खाक झाल्या. काही वेळाने गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.मात्र नशीब बलवत्तर म्हणून घरातील एकही व्यक्ती दगावली नसून घरात बांधलेली जनावरे बचावली.
-----------------
सिलेंडरचा स्फोटात घराच्या भिंतींना तडे
अचानक लागलेल्या आगीत घरातील चीज वस्तू तसेच इतर वस्तू जळत असतानाच काही वेळातच सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले असल्याने जळीतग्रस्त शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
COMMENTS