सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर येथे रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम नगरसेवक किरण दगडे पाटील युवामंच तर्फे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात २० कर्तुत्वान महिलांचा सन्मान पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवार दि.१ रोजी करण्यात आला.
छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भरवण्यात आलेल्या पैठणीच्या खेळात तालुक्यातून हजारोंच्या संख्येत महिला सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व नगरसेवक किरण दगडे पाटील,जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते झाले. भोर येथील शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेज च्या मैदानावर साधारणतां 5000 महिलांच्या उपस्थिती प्रसिद्ध सिनेअभिनेता क्रांतिनाना मळेगावकर व बालगायिका Tv स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या सूत्रसंचालनाखाली न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध सिने अभिनेते सैराट फेम आकाश ठोसर व देवमाणूस फेम किरण गायकवाड हे खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे प्रथम पारितोषिक सौं रेश्मा अंकुश कांबळे यांनी स्कुटी गाडी जिंकून होम मिनिस्टरचा मान मिळवला ,द्वितीय अक्षदा संपत गायकवाड येलएडी टिव्ही ,तृतीय क्रमांक पुष्पा गोविंद म्हेत्रे यांनी फ्रिज ,चतुर्थ क्रमांक श्रद्धा संदीप कांबळे पीठ गिरणी, पंचम क्रमांक अश्विनी व्यकटेश शिंदे शिलाई मशीन यांनी पारितोषिके पटकवण्याचा मान मिळवला.तर १०० महिलांना पैठण्या नगरसेवक किरण दगडेपाटील सरपंच पियुषा दगडे पाटील यांच्या हस्ते देण्यात आल्या.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड,युवानेते राहुल दगडेपाटील,वेल्हे तालूकाध्यक्ष आनंद देशमाने, युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, भोर शहराध्यक्ष सचिन कण्हेरकर,राष्ट्रवादी शहराध्यक्ष केदार देशपांडे,अतुल काकडे,सोमनाथ ढवळे,रोहन भोसले, सरपंच प्रवीणजी जगदाळे, कुणाल धुमाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.