सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पूर्वीच्या काळात बहुतांशी जणांची जन्मतारीख १ जून गृहीत धरली जाऊन शाळेत दाखल केली जायचे.त्यामुळे शाळेतील जन्म तारखेनुसारच सरकारी नोकरीत मिळत होती.या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील दरवर्षी हजारो जण ३१ मे ला सेवानिवृत्त होत असतात तर १ जून जन्मतारीखेनुसार वाढदिवस अनेकांचे वाढदिवस साजरे झाले.
तालुक्यातील हजारो जणांवर ३१ मेच्या सेवानिवृत्तीनमित्त तर १ जूनच्या वाढदिवसासाठी
मित्रपरिवार,पई-पाहुणे तसेच ग्रामस्थांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.बहुतांशी सेवानिवृत्त व वाढदिवस धारकांनी सामाजिक बांधिलकी जपत छोटे मोठे सामाजिक उपक्रम राबवले तर काहींनी अन्नदान श्रेष्ठ दान समजून स्नेहभोजन दिले.सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने तसेच वयोवृद्ध ,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार-सन्मान तर वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई ,पुणेहून भोर तालुक्याच्या ग्रामीण भागात नागरिक आल्याने मोठी गर्दी झाली आहे.तर बच्चे कंपनी उन्हाळी सुट्ट्यांची मजा लुटत शेतातील आंबे,जांभूळ तसेच डोंगर रांगांमधील करवंदे खाण्यात मग्न झाल्याचे चित्र आहे. प्रामाणिकपणे सरकारी नोकरी करून ३२ वर्षांनी सेवानिवृत्त होत असताना मनाला समाधान लाभत आहे.तर सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त तसेच एक जूनच्या वाढदिवसाला ग्रामस्थ,मुले, सुना,नातवंडे, नातेवाईक यांनी आदराने शुभेच्छा दिल्याने मन भारावून गेल्याचे बाजारवाडी ता.भोर येथील सेवानिवृत्त एसटी चालक दशरथ चौधरी सांगितले.
COMMENTS