सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी ता.भोर गावच्या हद्दीत रस्ता ओलांडत असताना मोटार सायकलने दिलेल्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
सफीना बेगम वय -२० असे अपघातात मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत रहीस अनिस मोहम्मद वय -२९ रा. शिरवळ, ता. भोर, मुळ रा. सतना, मध्य प्रदेश) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धांगवडी ता.भोर गावात चालू असलेल्या बांधकाम साईटवरून रविवार दि. २ जून सायंकाळी ६ वाजता शिरवळ येथे घरी परतत असताना राजगड कॉलेजच्या स्टॉपसमोर रस्ता ओलांडत असताना मोटार सायकल (एमएच १२ एल ई ०१४८) दिलेल्या घडकेत सफीना बेगम या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठविला. अपघातात मृत पावलेल्या तरुणीच्या मृत्यूस मोटार सायकल चालक जबाबदार असल्याची तक्रार रहीस मोहम्मद यांनी दिली आहे. दिलेल्या तक्रारीवरून स्वप्नील अजय बोथे(रा. बुलठाणे, तापोळा रोड ता. महाबळेश्वर) या मोटार सायकल चालकावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार खेंगरे करीत आहेत.
COMMENTS