सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर येथील घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच रविवारी पहाटे शिरष्णे गावात घरफोडीची घटना घडली. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
शुक्रवारी पहाटे 1 ते 4 च्या दरम्यान चोरट्यांनी वडगाव निंबाळकर येथे पाच घरे फोडली आणि सोन्याचा ऐवज घेऊन पोबारा केला. आता शिरष्णे येथेही सोने चांदीचा ऐवज आणि दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. काका खलाटे, श्री. मोरे, अमोल खलाटे, पोपट गाडेकर यांची चार घरे चोरट्यांनी पहाटे दोननंतर फोडली. यापैकी दोन घरे बंद होती. यामध्ये सोने-चांदीचा ऐवज आणि दुचाकी चोरून नेण्यात चोरट्यांना यश आले. तीन चोरटे पळून जाताना ग्रामस्थाना दिसल्याचे बोलले जाते. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वडगांव निंबाळकर पोलिस उशिरापर्यंत करत होते.