Wai News l मागील १० महिन्यात फसवणुक करुन परस्पर विकलेले सुमारे ९० लाख रुपये किंमतीचे ०६ ट्रक हस्तगत : वाई पोलीस ठाण्याच्या तपासपथकाची कामगिरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
सदर गुन्ह्यातील सहा ट्रक हे वाई तपास पथकाने औरंगाबाद, हैद्राबाद, कर्जत, व खुलताबाद येथुन यापुर्वी जप्त केलेले आहेत.     

उर्वरीत ट्रक हा साक्षीदार रोहित रमेश शिंदे यांचे मालकीचा आयशर प्रो कंपनीचा १११० मॉडेलचा ट्रक क्र एमएच ११ सीएच ५१६० हा असुन सदर गुन्हयाचे अनुशंगाने सखोल तपास करता, सदरचा ट्रक हा नाशिक परिसरात एक अनोळखी इसमाकडे असल्याबाबत खात्रीलायक माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांस प्राप्त झाली.  त्यानुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी वाई पोलीस ठाण्यामधील तपासपथकाचे अधिकारी अंमलदार यांस फसवणुक करुन परस्पर विकलेला ट्रक जप्त करण्यासाठी नाशिक येथे जाऊन तपास करुन सदरचा ट्रक हा हस्तगत करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषण केल्यानंतर सदरचा ट्रक हा नाशिक शहरात असल्याचे निष्पन्न झाल्याने वाई पोलीस ठाण्याचे तपासपथक तपासकामी जिल्हा नाशिक येथे रवाना होऊन वीस लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक क्र एमएच ११ सीएच ५१६० हा दिनांक १४/०६/२०२४ रोजी जिल्हा नाशिक येथील म्हसरुळ पोलिस ठाणेचे हद्दीमधुन ईमाम खान या व्यक्ती कडुन सापळा रचुन ताब्यात घेतला.
        ऑगस्ट २०२३ पासुन फसवणुक करुन परस्पर विकलेले सुमारे ९० लाख रुपये किंमतीचे ट्रक व डंम्पर महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातुन तसेच हैद्राबाद गुजरात येथुन ताब्यात घेतले आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी साो वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, तपासपथकाचे पोलीस उप निरीक्षक सुधिर वाळुंज, पोलीस अंमलदार राम कोळी, नितीन कदम, हेमंत शिंदे, श्रावण राठोड व विशाल शिंदे यांनी केली आहे.
To Top