सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

'दादा' तुमच्या मागे स्वयंघोषित 'दादा' होणाऱ्यांचा बंदोबस्त करा : कार्यकर्त्याचे अजित दादांना लिहिलेले पत्र होतेय सोशल मीडियावर व्हायरल

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
निंबुत (खंडोबाचीवाडी) ता. बारामती येथील किरण लकडे ह्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट पत्र लिहीत गाऱ्हाणे मांडले आहे. सद्या हे वस्त्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
            किरण लकडे यांनी अजित पवारांना लिहलेल्या पत्रात म्हणटले आहे की, दादा, विकासकामांची दोर हातात घेऊन आपण युतीच्या सरकारमध्ये सामील झालात, आनंद वाटला. उपमुख्यमंत्री पदही मिळालं तेव्हाही आनंद वाटला आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला जेव्हा अर्थमंत्री पद दिलं गेलं तेव्हासुध्दा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जसे आपल्या दुःखात सहभागी झालो अगदी तसंच आपल्या सुखातदेखील सहभागी झालो.

पुढे जाऊन लोकसभेच्या निवडणुकीचा धुरळा उठला, आपण केलेली विकासकामे सांगत त्याच्याच जोरावर मतदान मागितलं, पण भावनिकतेच्या लाटेपुढे विकासकामांनी जोर धरला नाही. पण मग आपल्या पराभवाला भावनिकतेचं नाव देऊन मोकळे झालो, पण त्याच्यामागे असणारी इतर कारणांची आपण शहानिशा करणार आहोत की नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं अन जनतेचं खरं मत आपण विचारात घेणार आहोत की नाही त्यावर देखील चर्चा व्हायलाच हवी कारण हे खरं अन वास्तवदर्शी मत आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत हे ही नाकारून चालणार नाही.

दादा, आता तुम्ही विचाराल की 'त्यांना कुणी अडवलंत?' अहो त्यांनीच अडवलंय ज्यांनातुम्ही सहकारी संस्था, बँका, स्थानिक स्वराज्य संस्थांची पदं अन दुसऱ्या फळीतील नेतेपद अगदी खिरापत वाटल्यासारखी वाटून टाकलीत.

अहो, ही नेतेमंडळी कधी गाडीची काच खाली घेत नाहीत. की कधी कुणाच्या सुख-दुःखात सहभागी होत नाहीत अन मग अशा वागण्यानं त्यांचा गावातला जनसंपर्क कमी व्हायला असा किती वेळ लागतोय ओ. तुम्ही दिलेल्या पदांचा वापर यांनी सर्वसामान्य लोकांसाठी नव्हे तर यांची घरं भरण्यात अन नातेवाईक आप्तेष्ट मंडळी मोठी करण्यासाठी केलाय. हे मी एकटाच नाही म्हणत अगदी कुठल्याही गावात गेला तरी चारचौघात हीच चर्चा सुरूय अगदी खुल्लमखुल्ला !

हे झालेत यांनी यांच्या पदाचा केलेला 'भलताच' वापर पण मग आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता आमचं काम घेऊन यांच्याकडे गेलाच तर त्या कामाला टोलवाटोलवीचं उत्तर देणं, वेळप्रसंगी धमकीवजा इशारा अन सुचना देणं हा यांचा उद्योग. आणि यातूनही आम्ही यांना बगल देऊन आपल्या 'सहयोग' वर किंवा जनता दरबारात यायला निघालो की आलेच आडवे पाय घालायला अन आम्हाला परावलंबी होऊ न द्यायला... 'आरं मी करतुकी तुझं काम, आता एवढ्‌यासाठी हिथं दादाकडं आलाय व्हह्य रं?' असं म्हणून कित्येक पावलं आपल्या घरासमोरून अगदी भिकाऱ्याला हकालल्यागत हाकलून लावलेत. बरं मग यांच न ऐकून, माघारी नाही जाऊन आम्ही काय करायचं शेवटी गावात आम्हाला रोज यांचीच तोंडं बघायचीत.

अन यांच असल्या बरबटलेल्या तोंडांनी हे गावपुढारी मतं मागायला गेली अन त्याचा परिणाम आपल्यासमोर आहेच की. यांचे हे बरबटलेले चेहरे अन श्रेयवादाचा वाद आपल्याच मतदानावर विपरीत परिणाम घडवून आणतोय आणि म्हणूनच म्हणतो या विधानसभेला आधी ही स्वयंघोषित पुढारी दुसऱ्या मतदारसंघात फिरवा अन तुमची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्ता अन जनतेच्या हातात द्या, इथली लोकं तुम्हाला मताचा जोगवा अगदी खुल्यामनानं वाढतील यात शंकाच नाही.

दादा, आता थांबतो खूप गाऱ्हाणं घातलं तुमच्या कानावर. आता एक फक्त शेवटचं एवढंच की तुम्ही तालुका दौऱ्यावर असताना हार तुऱ्यांची थैली, गाड्यांचा लवाजमा अन धिप्पाड कार्यकर्ते आणि ठेकेदारांची फौज घेऊन फिरणारे हे गावपुढारी तुमच्या माघारी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि लोकांवर त्यांचं 'दादा' पण मिरवायला मोकळे होतात. आम्हाला 'दादापण' चालतं ते फक्त अजितदादांचंच... दादा एवढं सगळं ऐकल्यावर तरी तुम्ही तुमच्या माघारी स्वयंघोषित 'दादा' होणाऱ्यांचा बंदोबस्त कराल, एवढीच माफक अपेक्षा...

COMMENTS

जाहिरात ..!

जाहिरात ..!
Name

Accident,4,baramati vidhansabh,1,Bhor Accident,1,bhor crime,1,Bhor News,1,Bhor vidhansabha,1,blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7626,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,Crime,4,karate,1,mumbai,1,phaltan Crime,1,someshwar karkhana news,1,video,1,vidhansabha,1,wai crime,1,कंपनी,1,किल्ले बनवा स्पर्धा,1,क्राईम,1,खेड-शिवापूर टोलनाका,1,जावली विधानसभा,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,निधन वार्ता,3,बारामती विधानसभा,2,ब्लॉग,4,भोर विधानसभा,5,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,राजीनामा,1,लसीकरण,1,व्याख्यानमाला,1,शेती,1,साहित्य,1,सोने- चांदी बाजारभाव,1,सोमेश्वर कारखाना,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सोमेश्वर रिपोर्टर : 'दादा' तुमच्या मागे स्वयंघोषित 'दादा' होणाऱ्यांचा बंदोबस्त करा : कार्यकर्त्याचे अजित दादांना लिहिलेले पत्र होतेय सोशल मीडियावर व्हायरल
'दादा' तुमच्या मागे स्वयंघोषित 'दादा' होणाऱ्यांचा बंदोबस्त करा : कार्यकर्त्याचे अजित दादांना लिहिलेले पत्र होतेय सोशल मीडियावर व्हायरल
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEicTZQVb-o7XsH3y0uV0hM2TxXMtRzEADWLAPU7arIEn456JHEbITOam4mdND23iTdLWs1QE4Dk2nwb0-8zOiQuaX5MbKRfgXBgvzy52A-B78Jxwv8Qha5DAv-jsQEpJiPHTWVl40ubfYBhHv0Se0f4ikeM6pm6RnHkoLBCXkvmgH6000WKHypjjwkVEXyw
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEicTZQVb-o7XsH3y0uV0hM2TxXMtRzEADWLAPU7arIEn456JHEbITOam4mdND23iTdLWs1QE4Dk2nwb0-8zOiQuaX5MbKRfgXBgvzy52A-B78Jxwv8Qha5DAv-jsQEpJiPHTWVl40ubfYBhHv0Se0f4ikeM6pm6RnHkoLBCXkvmgH6000WKHypjjwkVEXyw=s72-c
सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2024/06/blog-post_27.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2024/06/blog-post_27.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy