सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आपल्या साई सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड आयसीयू येथे हृदयरोग विभाग कक्ष कार्यरत झाला आहे.
त्याच्यामध्ये गुरुवारी दोन अँजिओग्राफी यशस्वीरित्या करण्यात आले त्याबद्दल माहिती देत असताना हॉस्पिटलचे डॉ. विद्यानंद भिलारे एम डी व डॉक्टर राहुल शिंगटे यांनी सोमेश्वर पंचक्रोशी मध्ये गोरगरीब व सामान्य जनतेला अचानक हृदयरोग किंवा त्रास झाल्यास धावपळीतून जाणारा जीव वाचवा व वेळेत उपचार मिळावे आणि रुग्णांची लवकर सुधारणा होण्याकरता सुसज्ज असा अत्याधुनिक हृदयरोग विभाग साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू झाला. हृदयरोग तज्ञ डॉ. प्रशांत सोनवणे यांनी नक्कीच जनतेला याचा फायदा होऊन अनेक लोकांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश येईल अशी आशा व्यक्त केली.