सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे ; मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील वेल्हे येथील डॅाक्टर जाधव दांपत्याकडुन सतरा वर्षापासुन सेवा सुरु आहे. आळंदी येथुन वारी निघाल्यानंतर दोन दिवस वारी पुण्यात मुक्कामी संपल्यानंतर अवघड अशा दिवे घाट पार केल्यानंतर सासवड मुक्कामी येते.यामध्ये
राजगड तालुक्यातील बाळकृष्ण महाराज फणसे दिंडी क्रमांक 88 येथील वारक-यांचे हात,पाय,घुडगे,सांधे दुखत असतात.अवघड अशा घाटातुन पायी चालल्याने वयंस्कर वारक-यांच्या अंगात ताप येवुन अंग खुपच दुखत असते.नेमकी वारक-यांची गरज ओळखुन
वारकरी सेवा हीच इश्वर सेवा समजुन राजगड तालुक्यातील वेल्हे येथील डॅाक्टर जितेंद्र जाधव
व त्यांच्या पत्नी डॅाक्टर नलिनी जाधव यांनी येथील वारक-यांची तपासणी करुन मोफत गोळ्या,
औषधे,इजेक्शन देण्यात आले.या आरोग्य सेवेसाठी उद्योगपती एस.पी.देशमुख,चाकण शिक्षण संस्थेचे
अध्यक्ष श्यामराव देशमुख,श्रींमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचे विश्वस्त मिलिंद सातव,व व्यवसायिक
मनोज मांढरे यांनी औषधे पुरविली.राजगड तालुका बाळुकृष्ण महाराज फणसे दिंडी क्रंमाक 88 चे अध्यक्ष
दिनकर धरपाळे यांनी डॅाक्टर दांपत्यांचे स्वागत केले.यावेळी डॅाक्टर दापंत्यांची कन्या अदिती जाधव,राजगड कारखान्याच्या संचालिका शोभा जाधव,माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर,मोहन शिळीमकर,प्रभाकर शिंदे
आदी उपस्थित होते.
COMMENTS