सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील होळ येथे डीपी मध्ये बिघाड काढण्यासाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
हनुमंत सुनील सूर्यवंशी वय २५ रा. होळ ता. बारामती असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हनुमंत हा वायरमन हाताखाली काम करत होता. होळ येथील डीपी मधील बिघाड काढण्यासाठी गेला असता शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. ही घटना सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली. वडगाव निंबाळकर पोलीसात घटनेची नोंद देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS