सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शाळकरी मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस स्कूल अपघात झाल्याची घटना बारामती तालुक्यातल्या मगरवाडी भागात घडली.
या अपघातात दोन मुले जखमी झाले आहेत तर अन्य मुले किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात ईश्वरी जालिंदर जानकार व शिवम विशाल करे दोघेही रा. मुढाळे ता. बारामती हे दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. हे दोन्ही विद्यार्थी वाघळवाडी येथील सहयाद्री पब्लिक स्कुल मध्ये शिकत आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, सोमेश्वरनगर भागातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना घेऊन ही बस मुढाळे तसेच वाकी-चोपडज वरून सोमेश्वरनगरच्या दिशेने येत असताना चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. सोमेश्वरनगर येथील शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी आसपासच्या गावात शाळकरी मुलांसाठी स्कूल बसची सोय करण्यात आली आहे. मुलांना घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने ही स्कूल बस सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अचानक उलटली. यावेळी बस मध्ये तीस मुले होती. सुदैवाने अपघातात दोन मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. बाकी अन्य मुले सुखरूप आहेत.