सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
कापूरव्होळ ता. भोर येथे शेतात मोटर चालू करण्यासाठी गेलेला तरुण मच्छिंद्र बबन अहिरे वय- ३८ यास महावितरणच्या खांबावरील विज वाहक तार पाण्यात पडल्याने करंट पास होऊन तरुणाला शॉक लागला. यामुळे तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि .१८ घडली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या भोर तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे तसेच जोरदार वारे वाहत आहे.पाऊस व वाऱ्यामुळे महावितरणच्या वीज वाहक तारा तुटण्याचे प्रकार वारंवार घडत असतात.त्याप्रमाणेच कापूरहोळ येथे महावितरणच्या खांबावरील विज वाहक तार शेतातील पाण्यात तुटून पडली होती.मच्छिंद्र शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला असता विजेचा करंट पाण्यातून पास होऊन मच्छिंद्र याला जोरदार शॉक बसला.मच्छिंद्र अहिरे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.