सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
निरा ता. पुरंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुणे जिल्हा सरचिटणीस तनुजा शहा यांची आंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज महिला संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाली आहे.
गेली अनेक वर्ष तनुजा शहा आपल्या धमाका ग्रुपच्या माध्यमातून परिसरातील महिलांना सोबत घेऊन अनेक सामाजिक तसेच मनोरंजनात्मक उपक्रम राबवतात. शाळेत शिकणाऱ्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप नुकतेच त्यांनी केले होते. कोरोना काळात देखील आपल्या सामाजिक कार्या ला अनुसरून अन्नधान्याचे कीट वाटप त्यांनी निरा परिसरात केले होते त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची पुणे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी महिला सरचिटणीस पदी निवड झाली होती. जैन समाज महिला संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे निरा परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.