पुरंदर l नीरेत मोहरम निमित्त सरबतचे वाटप : इमाम हसन व हुसेन यांना अभिवादन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा - विजय लकडे
नीरा‌ ( ता.पुरंदर) येथे  मोहरमच्या निमित्ताने इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहंम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हसन आणि हजरत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ ‘शोहदा- ए- करबला’च्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजरत इमाम हसन व हुसेन यांना अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्त नीरा ग्रापंचायत कार्यालयासमोर नीरा सुन्नत जमात व 
सुफी ए बा सफा फाऊंडेशन यांच्या वतीने बुधवारी (दि.१७) मोहरम निमित्त सरबतचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक हिंदू - मुस्लिम बांधवांनी सरबतचा आस्वाद घेतला.
           यावेळी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, दत्ताजीराव चव्हाण, अनिल चव्हाण, प्रमोद काकडे, 
अभिषेक भालेराव, विजय शिंदे सचिन मोरे यांच्यासह मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. सिकंदर शेख, जलील काझी, मन्सुर सय्यद, नदीम सय्यद, जावेद शेख, 
रईस शेख, गुलाम आतार यांच्यासह अनेक मुस्लिम तरूणांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------
To Top