सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर :प्रतिनिधी
बारामती येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी झालेले लोक अदालतीमध्ये 5513 खटल्यांचा निपटारा झाला असून 12 कोटी 59 लाख 6717 रुपयांची वसुली झाली आहे .
जिल्हा न्यायाधीश आर के देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व न्यायाधीश वर्ग व बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बर्डे व सहकारी वकील यांचे संयुक्त विद्यमाने हे लोक न्यायालय पार पडले.
एकूण सहा पॅनल मध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आय ए आर मरछिया कोर्ट, एम आर वानखेडे कोर्ट, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ओ एम माळी कोर्ट, डी.पी पुजारी कोर्ट, पी पी काळे कोर्ट, व्ही व्ही देशमुख कोर्ट यांचेसह बारामती बार मधील वकिलांनी काम केले.
सदर लोक न्यायालय मध्ये दाखल पूर्व प्रकरणांमध्ये चार कोटी 22 लाख 78 हजार 175 रुपयाची वसुली झाली, मोटार अपघाताचे दहा खटले निघाली निघाले त्यामध्ये एकूण सात कोटी 89467 रुपयांची नुकसान भरपाई पिडीतांना मंजूर करण्यात आली, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कायद्यांतर्गत पाच कोटी 4 लाख 43 हजार 409 रुपये वसूल झाले. तेरा दिवानी खटले निकाली निघाले असून 64 लाख 46 हजार 448 रुपयांची तड जोड विविध दाव्यामध्ये झाली. करसंबंधीचे( रेवेन्यू) चे 3155 इतके दावे निकाली निघाली असून एक कोटी 14 लाख 24 हजार 603 रुपये वसूल झाले. एकूण 5544 दाव्यामधे बारा कोटी एकोन साठ लाख सहा हजार सातशे सतरा दावे निकाली निघाले.
"नियमितपणे होणाऱ्या लोक न्यायालयामध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सामील होऊन आपल्या खटल्याचा तडजोडी द्वारे खटले मिटवल्यास कायदेशीर सोपस्कारामुळे होणारा विलंब टळू शकतो असे मत जिल्हा न्यायाधीश आर के देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केले.
COMMENTS