सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाघळवाडी येथील शाळेतील मुलांना वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्याना शालेय गोडी वाढविण्यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य दिले तर त्यांना शिक्षणासाठी मदत होईल हा उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन अजित पवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने वाघळवाडी ग्रामपंचायतींच्या वतीने गावातील जिल्हा परिषद शाळा वाघळवाडी येथील ४३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमेश्वर नगर येथील ७१ तसेच तीन अंगणवाड्यातील ७३ विद्यार्थ्यांना आणि सोमेश्वर विद्यालय या शिक्षण संस्थेत गावातील शिक्षण घेत असलेल्या ७९ विद्यार्थ्यांना अशी मिळून २६६ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुलांच्या हातात साहित्य पडल्यावर मुलांनी आनंद व्यक्त केला. यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शब्दरुपी शुभेच्छा दिल्या.
गावातील विकासात भर घालण्यासाठी अजितदादांनी मोठी भरीव मदत केली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय साहित्य देऊन विधायक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.शालेच्या ठिकाणी अद्यावत सुविधा देण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना अध्यक्षस्थानी असलेले सरपंच अँड.हेमंत गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच गणेश जाधव, सदस्य अनिल शिंदे, तुषार सकुंडे, प्रभाकर कांबळे, विशाल हंगिरे,सदस्या निशिगंधा सावंत,धनश्री जाधव, अनिता दडस, सोनाली दडस, आशा चव्हाण, समितीचे अध्यक्ष बापू मोटे,ग्रामविकास अधिकारी संजयकुमार भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका रसाळ यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका गितांजली बालगुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका आशा जाधव यांनी मानले.
------------------
२६६ विद्यार्थ्यांना या साहित्यामध्ये स्कुल बॅग,एक रेघी-दुरेघी-चौकटी अश्या वह्या, पेन, पेन्सिल, पाटी, कँपास, चित्रकला वही,रंग खडू,साहित्य ठेवण्यासाठी पाऊच, लाकडी पट्टी,सचित्र बालमित्र,शिसपेन्सिल,खोडरबर आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
COMMENTS