सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नीरानजीक असलेल्या पाडेगांव (ता. खंडाळा) येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गाहचा ४० वा उरूस उत्साहात व शांततेत
साजरा करण्यात आला. उरूसानिमित्त हजारो भाविकांनी दर्शना साठी हजेरी लावली. ऊरूसानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या पाडेगाव ( ता.खंडाळा) येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गाह अनेक वर्षां पासून आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या दर्ग्याकडे पाहिले जाते.हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबांच्या ४० व्या ऊरूसाच्या उत्सवास शुक्रवारी दि.२६ जुलैला संध्याकाळी संदल व गिलाफच्या ( चादर) मिरवणूकीने सुरूवात झाली. ही मिरवणूक दर्गाह पासून नीरा गावातून काढण्यात आली होती. त्यानंतर राञी उशिरा बाबांच्या समाधीला धार्मिक विधिवत संदल लावण्यात आला.
शनिवारी २७ जुलैला ऊर्साच्या मुख्य दिवशी बाबांच्या दर्शनासाठी पाडेगांव, नीरा परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.तसेच रात्री मिलाद ख्वाणीचा कार्यक्रम पार पडला.रविवारी २८ जुलै ला सकाळी नऊ वाजता कुराण पठण झाल्यानंतर सकाळी ११ वाजता जियारतचा धार्मिक विधी करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
यावेळी पुरंदरचे आ. संजय जगताप, सोमेश्वर सह.साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, पुणे ट्रस्ट प्रँक्टीस असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड.शिवराज कदम - जहागिरदार, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे , निरेचे उपसरपंच राजेश काकडे, दत्ताजी चव्हाण, बाळासाहेब ननवरे, समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण, संदीप धायगुडे, अनिल चव्हाण, महेश काकडे, विक्रम दगडे, पाडेगांवचे भगवान माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबांचे दर्शन घेतले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मुस्तफा आतार यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. तर उपाध्यक्ष रशीदभाई सय्यद, सचिव फिरोज सय्यद, विश्वस्त मोहंम्मदगौस आतार यांच्यासह दर्गाह खिदमदगार कमिटीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------