भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ खोऱ्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी वाढल्याने सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर दरड प्रवन धानवली ता.भोर येथील ५० ते ६० लहान-थोर नागरिकांचे स्थलांतर धारांबे येथील मठात करण्यात आले.अशी माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार सचिन पाटील पोलीस,अप्पर तहसीलदार पुनम अहिरे,निरीक्षक अण्णा पवार सर्कल,तलाठी,कोतवाल यांनी तालुक्यात बहुतांशी ठिकाणी समक्ष गावं आढावा घेतला.यात सुरक्षेच्या दृष्टीने धानवली येथील नागरिकांना धारांबे येथे सुरक्षिततेसाठी स्थलांतरित केले.