Purandar Breaking l विजय लकडे l निरा नदीच्या पुलावर माऊलींचा परतीचा पालखी सोहळा रोखला : वारकऱ्यांचे रथापुढे ठिय्या आंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
मऊलींच्या परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदी नदीच्या पुलावर वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला आहे. सुमारे अर्ध्या तासाने पूर्वी माऊलींच्या पादुकांचे रथाच्या मागील वारकऱ्यांना दर्शन न दिल्याने रथाच्या मागील वारकऱ्यांनी रथापुढे येऊन ठिया आंदोलन केले आहे. 
         यावेळी माऊली माऊलीच्या जयघोषणात व टाळ वाजवत हे वारकरी गेली अर्धा तास बसून आहेत सोहळ्याचे मालक व विश्वस्त याबाबत अरेरावेची भूमिका घेत वारकऱ्यांची समझोता न करता रथ तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत याला वारकऱ्यांकडून प्रखर विरोध होत आहे. आषाढी एकादशीच्या दर्शनानंतर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाकडे निघाला आहे काल पाडेगाव तालुका खंडाळा येथील मुक्काम आटपून आज सकाळी पावणे नऊ वाजता नीरा नदीच्या पवित्र तीर्थ माऊलींना स्नान घालण्यात आले यानंतर माऊलींचा सोहळा माऊलींची पालखी सोहळा मालकांकडून पुन्हा रथाकडे आणत असताना प्रथेप्रमाणे रथाच्या पुढे दोन ओळी व रथाच्या मागे दोन ओळी वारकऱ्यांनी तयार केल्या होत्या सोहळा मालकांनी पादुकांचे वारकऱ्यांना दर्शन देणे हा एक अविस्मरणीय क्षण असतो यावेळी सोहळा मालकांनी रथाच्या पुढील दोन्ही ओळींना दोन्ही ओळीतील वारकऱ्यांना पादुकांचे स्पर्श दर्शन दिले मात्र माघारी फिरल्यानंतर रथाच्या मागील वारकरी विणेकरी व तुळशी घेतलेल्या महिलांना हे दर्शन घेता आले नाही सोहळा मालकांनी या पादुका पुन्हा रथात ठेवल्याने मागील वारकऱ्यांचे रथामागील वारकऱ्यांच्या हिरमोड झाला व त्यांनी लागलीच रथा पुढे येऊन या आंदोलन केले माऊली माऊलीचा जयघोष करत सुमारे पाऊण तास हा रथ अडवून धरला यानंतर सोहळा प्रमुख सोहळा मालक व आळंदी विश्वस्त यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र वारकरी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले यादरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे.
To Top