Bhor News l दरड प्रवण धानवलीत पुराच्या पाण्यात बैलाचा वाहून गेल्याने मृत्यू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टीने दोन ते तीन दिवस हाहाकार माजवला होता.ओढ्या-नाल्यांना पूर येऊन ओढे-नाले दुथडी भरून वाहत होते.यातच दरड प्रवण धानवली ता.भोर येथील शेतकरी मारुती कोंडीबा धानवले यांचा जर्शी जातीचा एक बैल ओढ्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बैलाचा गुरुवार दि .२५ मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असे धानवली येथील पोलीस पाटील
 महिपती धानवले यांनी सांगितले.
     शेतकऱ्याने डोंगर भागात चरण्यासाठी सोडलेला बैल घरी येताना गावामागच्या ओढ्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेला.स्थानिकांनी वाहून गेलेला बैल शोधण्याचा कसोशीने तात्काळ प्रयत्न केला.मात्र रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. सकाळी पुन्हा शोध म्हणून सुरू केली गेली यावेळी एक ते दीड किलोमीटर अंतरावर शुक्रवार दि.२६ मृत अवस्थेत बैल ओढ्यात सापडला. नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी हिरडस मावळ खोऱ्यातील शेतकरी संघटना म्हणून होत आहे.
To Top