सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील निरानजीक असलेल्या पाडेगाव (ता. खंडाळा) येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गाहचा ४० व्या उरूसाला आजपासून (२६ जुलै)
प्रारंभ होत आहे.तीन दिवस हा उरूस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेेे असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष मुस्तफा आतार यांनी सांगितले.
पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या पाडेगाव ( ता.खंडाळा) येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गाह अनेक वर्षां पासून आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या दर्ग्याकडे पाहिले जाते. हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबांचा आज शुक्रवार दि. २६ जुलैपासून ४० वा उरूस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. आज शुक्रवारी( दि.२६)सायंकाळी साडेसहा वाजतादर्गाहपासून निरा शहरातून संदलची मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री दहा वाजता ही मिरवणूक पुन्हा दर्गाह येथे येईल.त्यानंतर बाबांच्या समाधीला धार्मिक विधिवत संदल लावण्यात येईल.असे ट्रस्टचे उपाध्यक्ष रशीदभाई सय्यद, सचिव फिरोज सय्यद यांनी सांगितले.
उद्या शनिवारी २७ जुलैला ऊर्स असून बाबांच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. निरा, पाडेगाव, निंबुत, लोणंद, बारामती परिसरासह पुण्याहून दर्शनासाठी भाविक येत असतात. रात्री मिलादख्वाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी २८ जुलैला सकाळी नऊ वाजता कुराण पठण होणार आहे. त्यानंतर
सकाळी ११ वाजता जियारतचा धार्मिक विधी करण्यात येईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांनी उर्सच्या तीन दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन दर्गाह ट्रस्टच्या वतीने विश्वस्त इकबाल मुल्ला व मोहंम्मदगौस आतार यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------
COMMENTS