सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना मुख्य शाखा सोमेश्वरनगर यांचे वतीने विविध उपक्रम राबवित, शहिदांना श्रद्धांजली वाहत आज कारगिल दिन साजरा करण्यात आला.
भारतीय सैनिकांनी पाकिस्तान वर कारगिल मध्ये विजय मिळवून पाक व्याप्त लेह लदाख,द्रास परिसरात तीन महिने लढाई करून २६ जुलै १९९९ रोजी विजयाचा झेंडा उभा केला तेव्हापासून कारगिल दिन साजरा केला जातो. सोमेश्वर नगर मुख्य कार्यालयात यावेळी कारगिल मधील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर वीर नारी शितल बंटी सूळ,वीर नारी उषा गडदरे,वीर नारी हिराबाई हुंबरे यांचा साडी चोळी, शाल श्रीफळ देऊन सत्कार करणेत आला. तसेच वीर नारी व सरपंच पूजा वैभव गायकवाड,उपसरपंच शेखर गायकवाड ,माजी सरपंच वैभव गायकवाड ,कैलास मगर ,भाऊसाहेब लकडे ई. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करणेत आले. तसेच सेवानिवृत्तीनंतर राज्य राखीव पोलीस दलात भरती झालेले नितीन शेंडकर, 24 वर्षे सेवा करून सेनादलातून निवृत्त झालेले राजेंद्र विठ्ठल पवार यांचां ही सत्कार करणेत आला.
सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, उपाध्यक्ष भगवान माळशिकारे, तक्रार कमिटी अध्यक्ष गणेश आळंदीकर, ताराचंद शेंडकर , भरत मदने, विकास साबळे, बाळासो गायकवाड, मोहन गायकवाड, युवराज चव्हाण, इत्यादी माजी सैनिक उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये संघटनेचे तक्रार कमिटी अध्यक्ष ॲड. गणेश आळंदीकर यानी कारगिल दिनाचे महत्त्व व पार्श्वभूमी सांगितली. तसेच सैनिक संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.आभार उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यांनी मानले.