Dam Update l पाऊस थांबला : निरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी धरणांचा आजचा पाणीसाठा पहा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्र पावसाने हाहाकार माजवला. विशेषतः मुंबई, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामधून रेड अलर्ट जाहीर करण्यात आले. एक महिन्याचा पाऊस चार दिवसात पडला. त्यामुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत धरणे यावर्षी लवकर भरली. 
          निरा खोऱ्यातील निरा-देवघर, यशाजी कंक जलाशय (भाटघर) गुंजवणी ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत तर वीर धरण भरले असून दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता वीर धरण भरल्यानंतर तीन दरवाज्यामधीन निरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला. दिवसभर पावसाचा जोर असल्याने पाटबंधारे खात्याला वीर च्या विसर्गात वाढ करावी लागली. सायंकाळी तब्बल ६१ हजार ५०० क्युसेस ने निरा नदीला पाणी सोडावे लागले. निरा नदी देखील तब्बल तीन वर्षांतून वाहिली. आज दि. २६ रोजी पाऊस थांबला असला तरी घाटमाथ्यावर तुरळक पाऊस सुरू असून यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. सद्या काल सोडलेला ६१ हजार ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग कमी करून तो ४ हजार ५०० करण्यात आला आहे.
        आज सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत निरा-देवघर धरणात ७३.९१ टक्के, भाटघर धरणात ७५.४९ टक्के, वीर धरणात ९४.६१ टक्के तर गुंजवणी धरणात ६९.५६ टक्के पाणीसाठा आहे.
To Top