सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड : प्रतिनिधी
नांदगाव ता. कराड येथे शेतकऱ्यांना मोबाईल अॅपचा वापर शेतीसाठी कसा करायचा याचे प्रात्यक्षिक जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे येथील कृषीदुत देत आहेत त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना प्लॅन्टिक्स, इ पीक पाहणी , गुगल मॅप द्वारे नकाशा, किसान सुविधा वापरणे व ते किती फायदेशीर आहेत याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये गावनिहाय हवामान अंदाज त्याच बरोबर हवामान आधारित पिकांची निवड तसेच त्याचे व्यवस्थापन याबद्दल कृषी सल्ला सहज उपलब्ध होत आहे. ई पीक पाहणी ॲप मुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंद सहज करता येत आहे. तसेच शेळीपालन, कुक्कुटपालन, दुभत्या जनावरांचे व्यवस्थापन याबाबत देखील सल्ले ॲप मध्ये उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना त्याचा वापर उत्पादन वाढीसाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे. मोबाईल ॲपचा प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी कृषीदुत सौरभ दानोळे, अनिकेत बंडगर, आदित्य हुबाले, विश्वतेज देशमुख, ऋतुराज कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले तर प्राचार्य डॉ अशोक फरांदे कार्यक्रम अधिकारी प्रा दिपक भिलवडे व प्रा अमोल आडके यांचे विशेष सहकार्य लाभले..
COMMENTS