सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे ; मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील किल्ले तोरणा वर जाणाऱ्या रस्त्याच्या पहिल्याच पुलाच्या शेजारी असलेल्या भराव खचला असून या पुलाला भीती निर्माण झाली आहे, तर पानशेत ते साईव्ह रस्त्यास मोठमोठ्या भेगा पडल्या असून रस्ता खचून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर अडवली येथील वडगाव झांजे ते अडवली रस्त्याला जोडणाऱ्या फुलाला पावसाचा तडाका बसला असून पुलाचा काही भाग पाण्यात वाहून गेला आहे, त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे
राजगड तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून याचा फटका तालुक्याला बसत आहे वेल्हे ते तोरणा किल्ला सिमेंटचा रस्ता झाला असून जुने तहसील कचेरीच्या पाठीमागे तोरणा किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यास नव्यानेच पूल बांधण्यात आलेला आहे, या रस्त्यावर अतिक्रमण झाल्या असल्याने येथील भराव पावसाने कोसळला आहे त्यामुळे या पुलाला धोका निर्माण झालेला आहे ग्रामस्थांकडून पर्यटनासाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे अशी माहिती भाजप तालुका अध्यक्ष आनंद देशमाने यांनी दिली
तसेच पानशेत ते साईव्ह रस्त्यावर मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत हा रस्ता देखील खचला असून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे येथील सरपंच देविदास हानमघर म्हणाले की या रस्त्यासाठी शासनाच्या माध्यमातून भरीव निधी आला होता रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे झाले होते परंतु पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रस्त्यास भेगा पडल्या व रस्ता दोन फुटाणे खाली खचला आहे ज्या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती व्हावी अशी मागणी यावेळी सरपंच देविदास हनमघर यांनी केली आहे, तर अडवली येथील वडगाव झांजे ते अडवली या रस्त्यात मधील पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे, माजी सरपंच मोहन काटकर म्हणाले की अडवली ते वडगाव झांजे ,सुरवड, सोडसरपाले,सोंडे हिरोजी, सोंडे माथना, सोंडे कार्ला, आधी गावांना या पुलाद्वारे जोडले गेले आहे, येथील शेतकऱ्यांना हा पूल वाहतुकीसाठी अतिशय जवळ होता परंतु पावसाची संततधार सुरू असल्याने हा पूल पाण्यात वाहून गेला आहे