Dam Updated l घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला : निरा नदी पात्रात पुन्हा १४ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग वाढवला

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
डोंगर माथ्यावर पावसाचा जोर आज पुन्हा वाढल्याने निरा नदीत पुन्हा १३ हजार ९११ ने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. 
          निरा खोऱ्यातील निरा-देवघर, यशाजी कंक जलाशय, गुंजवणी ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत तर वीर धरण भरले असून दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता वीर धरण भरल्यानंतर तीन दरवाज्यामधीन निरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला. दिवसभर पावसाचा जोर असल्याने पाटबंधारे खात्याला वीर च्या विसर्गात वाढ करावी लागली. सायंकाळी तब्बल ६१ हजार ५०० क्युसेस ने निरा नदीला पाणी सोडावे लागले. निरा नदी देखील तब्बल तीन वर्षांतून वाहिली. आज दि. २६ रोजी पाऊस थांबला असला तरी घाटमाथ्यावर तुरळक पाऊस सुरू असून यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. सद्या काल सोडलेला ६१ हजार ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग कमी करून तो ४ हजार ५०० करण्यात आला आहे. मात्र आज पुन्हा निरा नदी पात्रात १३९११ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. 
           निरा-देवघर धरणात ७४.८७ टक्के, भाटघर धरणात ७७.८१ टक्के, वीर धरणात ९८.५५ टक्के तर गुंजवणी धरणात ७१.०१ टक्के पाणीसाठा आहे.
To Top