Bhor News l विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू : भोर तालुक्यातील तांभाड येथील घटना

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
तांभाड ता.भोर गावच्या हद्दीत शेतकऱ्याने गवत चरण्यासाठी नेलेल्या बैलाला विजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का लागल्याने बैलाचा मृत्यू झाला असल्याची घटना शनिवार दि. २७ घडली.
       स्थानिकांच्या माहितीनुसार तांभाड येथील शेतकरी काळूराम बारकू सोंडकर त्यांच्या बैलाला घेऊन गावच्या हद्दीत चरण्यासाठी गेले होते.परंतु गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे व वाऱ्यामुळे शेतात विद्युत वाहक तार तुटून पडली होती.तुटलेल्या तारेवर बैलाचा पाय पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.संबंधित शेतकरी यांनी याबाबत स्थानिक महावितरणचे कर्मचारी यांना माहिती दिली असता कर्मचाऱ्याने तातडीने येऊन विद्युत प्रवाह बंद केला. घटनेनंतर प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित असणारे तांभाड गावचे सरपंच अमोल शिळीमकर यांनी वीज वितरण कंपनीकडून घटनेची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. नुकसान भरपाई न दिल्यास वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
To Top