सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा ; प्रतिनिधी
धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढत असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची पाणी पातळी ५७९ मीटर झाली असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे ४६३७ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला तो वाढवून १४९११ क्यूसेस इतका करण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.
कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील.