सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा डावा कालव्यात भरावा वरुन जात असताना कालव्यात पाय घसरून पडल्याने काल एकाचा मृत्यू झाला आहे. काल दि. २४ रोजी दुपारी ही घडली.
वाघळवाडी ता.बारामती लोखंडीपुल येथील रहीवासी असलेले संजय अण्णा पवार वय ४५ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. निरा डावा कालव्या लगत असलेला भराव खचला असल्याने महावितरण कार्यालय नजिक असेलल्या मळशीचा लोखंडीपुल या ठिकाणाहुन कालव्यावरुन चालत जात असताना पाय घसरल्याने हा अपघात घडला.या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने संजय पवार यांना पडल्याचे पाहून शेजारी असलेल्या लोकवस्ती मधील नागरिकांना वाचविण्यासाठी बोलवले. पवार यांना येथील नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले असता ते मृत असल्याचे समजले.