Good News l निरा खोरे पाणलोट क्षेत्रातील सर्वात मोठे धरण भरले : आज आठ वाजता होणार पाण्याचा विसर्ग

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत धरण ९४.२६ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून सुरू असणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेता आज दि. ३१ रोजी संध्याकाळी ८ वा. धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे नदीपात्रामध्ये १ हजार ७५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
      नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. 
 
कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभाग, पुणे
To Top