सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांसाठी जागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुपे पोलिस स्टेशनच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी निर्भय रहा सजग रहा अभियानाचे आयोजन केले होते.
सुपे पोलीस स्टेशन, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी "सजग रहा, निर्भय रहा" या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पोलिस उपनिरिक्षक जिनेश कोळी, पोलीस कॉन्स्टेबल दिपाली मोहिते, ऋषिकेश वीर, शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दत्तात्रय शिंदे तसेच इयत्ता ७ वी ते वरिष्ठ महाविद्यालयाचे पदवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये पोलिस उपनिरिक्षक जिनेश कोळी आणि दिपाली मोहिते यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना कायद्यांच्या माहिती बरोबरच स्वसंरक्षण करताना पोलीस विभाग अथवा इतरांची मदत कशी घ्यावी याची माहिती दिली. महिला, तरुणी व विद्यार्थिनींवर होणारा अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी दैनंदिन जीवनात सजग राहणे महत्त्वाचे असल्याने हे अभियान सुपे येथे सुरू करण्यात आल्याचे कोळी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोहिते म्हणाल्या शाळेमध्ये येताना व जाताना रस्त्याने जर कोणी त्रास दिला. तर १०९१ या टोल फ्री नंबर वरून संपर्क करून पोलिसांची मदत घेऊ शकता. समाजामध्ये महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी हे पथक सदैव तत्पर राहिल याविषयी त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञारुची कांबळे यांनी केले. तर आभार दत्तात्रय शिंदे यांनी मानले.
...............................................
COMMENTS