Rajgad News l अडवलीतील मोफत आरोग्य शिबिरात २०५ रुग्णांची तपासणी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे - मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील अडवली येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात २०५ जणांची तपासणी करुन
औषधोपचार करण्यात आल्याची माहिती शिवार फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाळ इंगुळकर यांनी दिली.
           देवयांनी हॅस्पिटल पुणे, ताराचंद हॅस्पिटल पुणे, भांगे नेत्र रुग्नालय पुणे व शिवार फाऊंडेशनच्या यांच्या सयुक्त विद्यमाने  राजगड तालुक्यातील अडवली येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात हृद्यरोग, हाडांचे आजार, बी.पी.शुगर, डोळ्यांची तपासणी, तसेच महिलांचे आजार,लहान मुलांचे आजार,आदी सर्व आजाराची तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात
आले.तर डोळ्यांच्या रुग्नांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवार फाऊंडेशनचे गोपाळ इंगुळकर,डॅा.श्रीरंग लिमये,डॅा.कल्याणी भट,डॅा.रमेश भांगे,
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे,पुणे जिल्हा मध्यवर्ती 
सहकारी बॅंकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर संचालिका निर्मला जागडे,राष्च्रवादीचे तालुका अध्यक्ष किरण राऊत,प्रताप शिळीमकर
संदिप खुटवड,अनंता उफाळे,शंकर रेणुसे,शिवार फाउंडेशन ,भरत काटकर,अजय पुरोहित ,,स्वप्निल इंगुळकर , विकास कांबळे.सागर
दिक्षित आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.


To Top