सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दीपक जाधव
श्री क्षेत्र संगमबेट- वाळकी येथुन प्रस्थान ठेवलेल्या श्री संतराजमहाराज पालखीचे सुपेकरांच्यावतीने उत्साहात स्वागत केले.
या पालखीने छप्पन मेरु घाटाचे चढण पार करुन सुप्यात प्रवेश करताच येथील सोंड परिसरात पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच अश्विनी सकट, ग्रा. पं. सदस्य शफिक बागवान, सोमनाथ कदम, विशाल चांदगुडे, शंकर शेंडगे, सुधीर बारवकर, नीता बारवकर, मल्हारी खैरे, हभप प्रमोदमहाराज जगताप, अशोक बसाळे, प्रकाश चांदगुडे, पालखी प्रमुख सुरेशमहाराज साठे, ग्रामसेवक महेंद्र बेंगारे आदींसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी सुपे गावाकडे मार्गस्थ झाली.
यावेळी टाळ मृदंगाच्या निनादात विठ्ठल विठ्ठल म्हणत येथील ग्रामस्थांची भजनी दिंडी पालखीस सामोरी गेली. यावेळी पालखी आगमनाने येथील वातावरण भक्तीमय झाले होते. यावेळी वारकऱ्यांना मयुरेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने सीड बॉलचे वाटप करण्यात आले. छप्पन मेरु घाटाचे चढण पार करुन
येथील लोणकरमळा येथे पालखी विसावल्यावर भारुडाचा कार्यक्रम झाला. तसेच लोणकरमळा ग्रामस्थांच्यावतीने वारकऱ्यांना चहा नाष्टा देण्यात आला. त्यानंतर पालखी सुप्यात आली.
येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी वरच्या पेठेतील शहाजीराजे मैदानावर विसावली. यावेळी अश्वमेघाचे मोठे गोल रिंगण झाले. येथील रिंगण सोहळा पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर हरिनामाचा गजर करीत मुख्यपेठेतुन पालखी मुक्कामी स्थळाकडे मार्गस्थ झाली. पालखी तुकाई मंदिरात विसावल्यावर सार्वजनिक महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. येथील ग्रामस्थांच्यावतीने मिष्टान्न भोजन वारकऱ्यांना देण्यात आले. यावेळी येथील जय भवानी तरुण मंडळाच्या माध्यमातुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हभप प्रमोदमहारज जगताप यांचे वाटचालीचे किर्तन झाले.
दरम्यान पालखी प्रमुख सुरेश महाराज साठे म्हणाले की, संतराज महाराज पालखी सोहळ्याचे हे ५७ वे वर्षे आहे. तर यावर्षी वारकऱ्यांच्यासंख्येत वाढ होवुन सुमारे ३ हजार वारकरी पालखीसमवेत आहेत. त्यांच्या निवाऱ्यासाठी १७५ राहुट्याची सोय करण्यात आली आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी वारकऱ्यांसाठी आमदार राहुल कुल, चंद्रकांत थोरात, सागर खंडागळे, दत्तात्रय शेलार आदींच्यावतीने पाण्याच्या टॅंकरची सोय केली आहे. यावर्षी पालखी रथाला रांजणगाव सांडस येथील शेतकऱ्यांची बैलजोडीचा मान आहे. तर डॉ. सुधीर पवार, डॉ. आप्पासहेब दिवेकर आणि डॉ. विशाल रणदिवे यांच्यावतीने वारकऱ्यांना मोफत वैद्यकिय सेवा देण्यात येते. तर पालखी रथाला दररोज मच्छिंद्र आडागळे गृपच्यावतीने विनामुल्य फुलांची सजावट करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष साठे यांनी दिली.
याप्रसंगी सुपे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक जिनेश कोळी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ____________________
COMMENTS