सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील अनुजा नरेंद्र जैन हिने चार्टर्ड अकौंटंट ( सनदी लेखापाल) परिक्षेत पहिल्या प्रयत्नात उज्जवल यश संपादन केले आहे. नीरा येथील दिनेश मेडिकलचे मालक नरेंद्र तेजमल जैन यांची कन्या अनुजा हिचे सर्वञ कौतुक होत आहे.
दि.इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस ऑफ इंडियातर्फे ( आयसीएआय ) मे २०२४ मध्ये चार्टर्ड अकौंटंट ( सनदी लेखापाल) ची परिक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये अनुजा जैन हिने अतिशय खडतर अभ्यासक्रम न डगमगता आत्मविश्वासाने पुर्ण करून पहिल्या प्रयत्नात चार्टर्ड अकौंटंट ( सनदी लेखापाल ) परिक्षेत उज्जवल यश संपादन केले आहे.
विशेषत: चार्टर्ड अकौंटंट (सनदी लेखापाल) ची
अंतिम परिक्षा देत असताना अनुजा हिचे शैक्षणिक प्रशिक्षण क्रेडीट सुईस या जगातील नामांकित विदेशी कंपनीमध्ये झाले आहे.अनुजा जैन हिचे नीरा व परिसरातील ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे.