सोमेश्वर रिपोर्टर टीम–------
बारामती : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या माध्यमातून बारामती व पुरंदर तालुक्यातील गावांमधे 'हरित ग्राम' हा उपक्रम राबविला जाणार आहे.
सोमेश्वरनगर परिसरामध्ये अजितदादा उद्यानाअंतर्गत 'सोमेश्वर' देवराईच्या रूपाने जी वृक्ष लागवडीची मोहीम सुरू झाली त्याचाच पुढील टप्पा म्हणून 'हरित ग्राम' उपक्रमाचे आयोजन केल्याचे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड यांनी सांगितले.
बारामती व पुरंदर तालुक्यातील गावांचा विकास हा सर्वांगीण असावा, चिरकाल टिकणारा असावा तसेच पर्यावरण पूरक असावा या कल्पणेमधून व ग्रामीण भागातील वृक्षारोपण वाढविण्याच्या हेतूने एकूण ३०६५ देशी वृक्षांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
हरित ग्राम उपक्रमा अंतर्गत वितरित करण्यात येणारी झाडे -
कडुनिंब
पिंपळ
करंज
ताम्हण
रतनगुंज
ताम्हण
सीताफळ इत्यादी.
हरित ग्राम उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत, वृक्षारोपण संस्था, सामाजिक ग्रुप्सला सुद्धा रोपं मिळू शकतात.
टीप- आपली रोपांची मागणी दिनांक १७ जुलै पर्यंत नोंदवावी.
रोपांची आवश्यकता नोंदविण्यासाठी संपर्क क्रमांक - +919730839707
COMMENTS