सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात निंबुत व कोळीवस्ती आणि परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व बा. सा. काकडे विद्यालयात दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी कोळीवस्ती आयोजित दिंडीमध्ये अंगणवाडी व पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टाळ मृदुंग व विठू नामांनी पालखी मार्ग निनादला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश लकडे मुख्याध्यापक सुभाष दगडे, उपशिक्षिका विद्या भोसले अंगणवाडी कार्यकर्त्या शालन खोमणे,दिपाली लकडे यांनी पालखी सोहळ्याचे नियोजन केले.
तुळशी, पताका व टाळ घेऊन विठ्ठल भक्तीत रमबाण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वांनी लक्ष वेधले. दिंडी सोहळ्यात कोळीवस्ती व परिसरातील अबाल वृद्ध देहभाण विसरून सोहळ्यात सहभागी झाले. वयोवृद्ध महिलांनी सोहळ्यात फुगड्यांचा फेरा धरत रंगत आणली. व्हीनस सिटी येथे गोल रिंगण करून महिलांनी व शालेय मुलांनी विठू नामाचा गजर करत ठेका धरला.विठुरायाची आरती घेऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली.दिंडीत सहभागी शालेय मुलांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश लकडे यांनी केळी वाटप व सौ वनिता बामणे यांनी मिठाई वाटप केले. निंबुत गावचे सरपंच निर्मलताई काळे उपसरपंच अमरभैया काकडे, ग्रामपंचायत सदस्य शिरीष काकडे,विद्यादेवी काकडे, आरती काकडे व सुवर्णा लकडे इत्यादी मान्यवरांनी शालेय दिंडी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS