Karad News l जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी नांदगावतील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड : प्रतिनिधी
माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना शेतात कोणती व किती प्रमाणात खते वापरावीत आणि मातीचा नमुना कसा घ्यावा? याबाबत मार्गदर्शन झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी व मातीची सुपीकता याबाबत कृषीदूतां कडून मोलाचे मार्गदर्शन ठरले, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
         माती परीक्षणामुळे प्रामुख्याने मातीतील मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे प्रमाण तपासले जाते. त्यानुसार पिकांचे व खतांचे नियोजन केले जाते. तसेच पिकांना द्यावयाच्या खतांची मात्रा ठरवता येते. रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषिदूतांकडून करण्यात आले. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या
        संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. फरांदे, कार्यक्रम अधिकारी अमोल आडके , कार्यक्रम समन्वयक प्रा. डी. एस. भिलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत सौरभ दानोळे, अनिकेत बंडगर आदित्य हुबाले, विश्वतेज देशमुख, ऋतुराज कांबळे यांनी हा कार्यक्रम पार पाडला.
To Top