सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-शिरवळ मार्गावरील उत्रौली - वडगाव डाळ ता.भोर या गावांच्या मध्यंतरी भले मोठे वडाचे झाड कोसळल्याने चार तास दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली.तालुक्यात महत्त्वाच्या वाहतुकीच्या मार्गांवर मागील एक महिन्यात चार ते पाच मोठ मोठी झाडे कोसळल्याने झाडे कोसळण्याची सत्र सुरूच आहे.रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल.
उत्रौली व वडगाव डाळ येथे दोन गावांच्या मध्यंतरी ओढ्यालगत ३० ते ४० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड शनिवार;दि. १३ पहाटेच्या वेळी रस्त्यावर अचानक कोसळले. या रस्त्यावरून रात्री तसेच दिवसा शिरवळ बाजूकडे ये-जा करणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते.आतापर्यंत पाऊस सुरू झाल्यापासून महिनाभरात याच मार्गावर भली मोठी तीन झाडे कोसळली. एक झाड चालू वाहनावर कोसळले यात गाडीचे नुकसान झाले मात्र नशीब बलवत्तर म्हणून चालकासह प्रवाशी जखमी झाले नाहीत. तर दुसरे झाड भोर शहरा नजीकच्या हार्डवेअरच्या दुकानावर रात्रीच्यावेळी कोसळल्याने या घटनेतही मनुष्यहानी झाली नाही.सध्या पावसाळा सुरू आहे वारंवार महत्त्वाच्या वाहतुकीच्या मार्गांवर झाडे कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे लक्ष देऊन झाडे कोसळणार नाहीत ची दक्षता घ्यावी असे वाहन चालकांनी सांगितले.
COMMENTS