सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे बु : प्रतिनिधी
डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती चे विद्यार्थी रावे उपक्रमा अंतर्गत विविध गोष्टी करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून लाटे गावातील आईसाहेब मंदिराच्या आवारात दुधी भोपळ्याच्या रोपांची निर्मिती चे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते .
रोपे निर्मितीच्या प्रतिक्षिक च्या अंतर्गत कृषिकन्यांनी शेतकरी बांधवांना रोपे निर्मितीचे महत्व सांगितले . ते प्रोट्रे मधे कसे तयार केले जातात , त्याचबरोबर कोकोपीट चे महत्त्व शेतकऱ्यानं पटवून दिले . शेतकऱ्यांना कोणते रोपं आपण प्रोट्रे मध्ये निर्माण करू शकतो याची माहिती दिली . कृषिकन्यांनी प्रत्यक्षात रोपे निर्मितीची प्रक्रिया करून दाखवली व शेतकऱ्यांनी ते कसे करावे याचे धडे दिले .
ह्या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्रगतशिल शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. कृषिकन्यांनी शिकवलेल्या रोपे निर्मितिच्या संकल्पनेचा शेतकरी त्यांच्या शेतातील रोपे निर्मितीत वापर करतील असे आश्वासन शेतकरी बांधवांनी कृषिकन्यांना दिले .
या कार्यक्रमाचे नियोजन कृषिकन्या नेत्रा देसले , वसुंधरा नलावडे , अनुजा देशपांडे, श्रावणी चव्हाण, ज्ञानेश्वरी शेजवळ , सृष्टी डाळिंबे यांनी उत्कृष्ट रित्या केले . त्यांना कार्यक्रम अधिकारी प्रा . एस. पी. गायकवाड, प्रा. एस. व्ही. बुरुंगले आणि प्रा गणेश शिंदे (हॉर्टिकल्चर विभाग ) यांचे मार्गदर्शन कृषिकन्यांनी मिळाले .