सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
पूजा खेडकर प्रकरणाचे लोन आता बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर-वाघळवाडी पर्यंत पोहचले आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या नावे वाघळवाडी येथे गट क्रमांक ८ मध्ये १४ गुंठे क्षेत्र असल्याचे उघड झाले आहे. साधारणतः त्यांनी हे क्षेत्र १४ वर्षापूर्वी विकत घेतले आहे.
स्वतंत्र गाडी, बंगला, कर्मचारी अशा अवास्तव मागण्या केल्यानंतर प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूज खेडकर यांची राज्य सरकारने उचलबांगडी केली. खेडकर यांचे आणखी कारनामे आता उघड होत आहेत. खोट्या प्रमाणपत्रांआधारे पद मिळविल्याने त्यांची नियुक्तीच रद्द करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. खेडकर यांनी केंद्रीय नागरी सेवा आयोगाला अपंगत्वाच्या ओबीसी सादर केलेल्या प्रमाणपत्रांव्यतिरिक्त, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रामध्येही विसंगती आढळून आली आहे. त्यांच्या वडिलांनी दिलीप खेडकर यांनी अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविताना त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचे तपशील उघड झाले आहेत.
प्रतिज्ञापत्रात दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा केला होता. त्याआधारेच त्यांना आयएएस होता आले आहे. वास्तविक त्यांना मिळालेल्या गुणांआधारे त्यांना आयएएसची ८४१ वी श्रेणी मिळणे कठीण होते. याव्यतिरिक्त खेडकर यांच्या ओबीसी नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र बाबत ही विसंगती आढळून आली. आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांना म्हणाले, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती. त्यांनी आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती ४० कोटी रुपये असल्याचे दाखवले आहे.
तिच्या वडिलांची संपत्ती पाहता, खेडकर यांची ओबीसी नॉन-क्रिमिलेयर मधील पात्रतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली, हाही एक प्रश्न आहे.
COMMENTS