सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोढवे-बालगुडेवस्ती येथे गळ्यातले सोने हिसकवताना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बारामती येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यात कुसुम सोमनाथ बालगुडे वय ७० व रंजना कांतीलाल शिंदे वय ६० ह्या या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. कुसुम बालगुडे यांच्या दोन्ही हातावर व डोक्यावर वार केला असून दुसऱ्या महिलेच्या देखील हातावर वार केला आहे. बालगुडे कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार वरील दोन्ही महिला दि. ११ रोजी दुपारी शेतातील काम उरकून रस्त्याच्या कडेला बसल्या होत्या. त्याचवेळी तोंडाला बांधून दोन अनोळखी पुरुष पत्ता विचारायच्या निमित्ताने जवळ आले. त्यांनी कुसुम बालगुडे यांच्या गळ्यातील सोने हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी हातातील शेतीच्या अवजाराने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावर दोन्ही चोरट्याने त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये कुसुम बालगुडे यांच्या दोन्ही हातावर तसेच डोक्यावर त्याचबरोबर रंजना शिंदे यांच्या हातावर कोयत्याने वार केले. आरडाओरडा झाल्यावर चोरटे तेथून लंपास झाले.
COMMENTS