Baramati News l पोलीस मित्र हरपला...! सहाय्यक फौजदार संदीप मोकाशी यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे संदीप मोकाशी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. 
         अचानक उद्धभवलेल्या मेंदूच्या विकाराने गेली दीड महिना मृत्यूशी झुंज देत असलेले सहायक फौजदार संदीप पांडुरंग मोकाशी (वय ५२ वर्ष ) यांचे आज निधन झाले. त्यांचे मागे भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. 
        पोलीस दलामध्ये विविध पारितोषिक पटकावून त्यांनी गुन्हेगारांवर आपला वचक निर्माण केला होता.
पीएसआय अण्णा जाधव यांच्या गुन्हे शोध पथकामध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण गुन्हे यांचा शोध लावून गुन्हेगारांवर वचक बसवला होता. त्यानंतर त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत निरा येथे देखील अनेक महत्वपूर्ण कामगिरीत सक्रिय सहभाग घेतला. पोलीस स्टेशनमध्ये येणारे अनेक तंटे त्यांनी सामंजस्याने  देखील मिटवले. अतिशय मनमिळावू व मित भाषी असलेल्या संदीप मोकाशी याना दीड महिन्यापूर्वी अचानक चक्कर आल्याने पुणे येथे हलवण्यात आले होते. त्यानंतर ते कापूरहोळ नजीक खेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचे निधनाने बारामती व पुरंदर तालुक्यातील परिसरात शोक व्यक्त करण्यात आला. 
'सोमेश्वर रिपोर्टर' परिवारातर्फे अशा समाजसेवकाला भावपूर्ण श्रद्धांजली.
                अंत्यविधी दि. १२ रोजी सकाळी १० वाजता होळ (आठ फाटा) येथे राहत्या घरी केला जाणार आहे. 
To Top