सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव - प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अभिनव संकल्पनेतून आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात वह्या वाटप करण्यात आले.
पुरुषोत्तम जगताप यांनी आपल्या जन्मदिनी शुभेच्छा देताना फुलांचे बुके, हार, शाल न देता वह्या आणाव्यात असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो वह्या संकलित झाल्या. या वह्या वितरित करण्याचा कार्यक्रम आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पार पडला. यावेळी आंबी खुर्दच्या सरपंच पुष्पा कुतवळ, आंबी बुद्रुकच्या सरपंच शितल जगताप, डॉ. रणजित जगताप, स्वप्नील काकडे, प्रियांका जगताप, रवींद्र जगताप उपस्थित होते. यावेळी ५०० वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वप्नील काकडे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी वेळेचा योग्य वापर करून आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास यश सहज प्राप्त होते असे सांगितले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस पी होळकर, बी सी बालगुडे,महेंद्र कुतवळ, सोमनाथ डगळे, जी व्ही गाढवे उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत गडकरी यांनी केले तर आभार संतोष जेधे यांनी मानले.