Bhor News l संतोष म्हस्के l कोंढरी येथे गोठ्यात घुसून बिबट्याचा बैलावर हल्ला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील कोंढरी येथे बुधवार दि.१० रात्री अकराच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यामध्ये घुसून बैलावर हल्ला केल्याची घटना घडली. बैलाला बिबट्याने दुखावत केल्याने बैल जखमी झाला आहे.
       कोंढरी येथील पोलीस पाटील शंकर पारठे यांच्या गोठ्यामध्ये दोन लहान बैल बांधली असताना रात्रीच्या वेळेस बिबट्या गोठ्यात घुसला व हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बैलांनी हंबरडा फोडल्याने घरातील लोकं जागे होऊन आरडा ओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला.सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.हिरडस मावळ भागासह रिंगरोड वरील गूढे, निवंगन, कुढली,पऱ्हर, माझेरी या पट्ट्यात गावालगत घनदाट झाडी असल्याने बिबट्यासह वन्यप्राणी  वास्तव्यास असतात.तसेच बिबट्याने हल्ला करण्याचा घटना देखील वारंवार घडत असतात.मागील एक महिन्यात कोंढरी येथे तीन ते चार पाळीव कुत्र्यांवर तसेच पऱ्हर आणि निवंगन येथे  जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी हिरडस मावळातील ग्रामस्थांकडून होत आहे.
To Top