सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणी भापकर ; हेमंत गडकरी
राज्याच्या वैभवात भर घालणाऱ्या बारामती बस स्थानकाचे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र बारामतीच्या एस टी आगाराचा भोंगळ कारभार समोर आला आहे. लोणी पाटी परिसरात रस्त्याच्या कडेला एसटी बस चा बोर्ड अक्षरशः फेकून दिला आहे.
बारामती येथे आलिशान बस स्थानक सुरु झाले असले तरी उदासीन प्रशासन मात्र प्रशासनात निष्काळजीपणा सोडायचे नाव घेत नाही. मागील वर्षी आणि या वर्षी ही अनेक बसेसना गावांची नावे लिहलेले फलक नाहीत. वाहक - चालक चुना वापरुन गावांची नावे लिहत असतात. याबाबत बातमी प्रसिद्ध होताच सराफ संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष किरण आळंदीकर यांच्या पुढाकारातून अनेक बोर्ड मिळाले होते. मात्र एसटी आगराची पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती पाहायला मिळतेय. फलटण- शिरूर राज्य मार्गावर लोणी भापकर ते लोणी पाटी दरम्यान आड मार्गावर एसटीचा बोर्ड फेकून देण्यात आला आहे. बारामती - काऱ्हाटी शाळा या मार्गाचा तो फलक असून ये जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष हा फलक वेधून घेत आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा बारामतीच्या एसटी आगराचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
COMMENTS