सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
गडदरवाडी ता. बारामती येथे विजेचा शॉक लागून एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. रसिका सोमनाथ महानवर वय 30 वर्षे रा. गरदडवाडी ता. बारामती असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्रकाश दादासो कटरे रा. खंडोबाचीवाडी ता. बारामती यांनी वडगाव निंबाळकर पोलीसात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १० रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मयत रसिका ह्या गुरांच्या गोठ्यात जनावरांचे धारा काढुन झालेनंतर पत्र्याचे लोखंडी हुकाला दुधाने भरलेली स्टीलची बादली अडकवत असताना इलेक्ट्रीक शाँक बसुन त्या मयत झाल्या आहेत. पुढील तपास सफौ. वारुऴे हे करीत आहेत.
COMMENTS