Purandar News l सौंदर्य प्रसाधनाच्या नावाखाली गोव्याची दारू : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
सौंदर्य प्रसाधने वाहतुकीच्या नावाखाली विदेशी गोवा मद्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सासवडमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या एका कारवाईत तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहनचालक सुनील चक्रवर्ती या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
           गोवा राज्यातून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंग राजपूत यांना माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क, मुंबईचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच संचालक (अं. व. द.) प्रसाद सुर्वे यांच्या आदेशावरून पुण्याचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क, सासवड येथील पथकाने पुणे सातारा मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. हवेली तालुक्यातील खेड शिवापूर गावच्या हद्दीत, हॉटेल जगदंबसमोर वाहनांची तपासणी करीता असताना भारत बेंझ कंपनीचा एचआर नादन ६३ डी ८८७८ हा १४ चाकी ट्रक विजय थांबवून वाहन चालकाकडे चौकशी .द.) केली असता, चालकाने संशयास्पद वरून माहिती दिली.

सागर यावरून वाहन रोडच्या बाजूस खाली घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये थील गोवा राज्यातून विक्रीस आणलेले र्गावर विदेशी दारूचे बॉक्स आढळून सणी आले. मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खेड मद्याच्या बाटल्या दिसून आल्याने डॉटेल उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले. 

पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते करीत आहेत. उत्पादन शुल्क सासवड विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते, राम सुपेकर, रोहित माने, धवल गोलेकर, सहायक दुय्यम निरीक्षक सागर दुर्वे, संदीप मांडवेकर, जवान भागवत राठोड, तात्या शिंदे, समीर पडवळ, अक्षय म्हेत्रे, रणजित चव्हाण, राम चावरे, सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे यांनी ही कारवाई केली.
-----------------------
दीड कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त
■ रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ७९,६८० सीलबंद बाटल्या (१,६६० बॉक्स), रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की ७५० मिली क्षमतेच्या ६,४८० सीलबंद बाटल्या (५४० बॉक्स) मिळून आल्या. तसेच एक मोबाइल संच आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला भारत बेंझ कंपनीच्या वाहनासह एकूण १ कोटी ५१ लाख ६,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
■ वाहन चालकाकडे मद्य वाहतुकीसंदर्भात कोणताही वाहतूक परवाना अथवा कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. सदरचा मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करून आणल्याचे आरोपीच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्याच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८०, ८१, ८३, ९०, १०३ व १०८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
To Top